Categories

इंद्रायणी काठी

गीत ग. दि. माडगूळकर
संगीत पु. ल. देशपांडे
स्वर पं. भीमसेन जोशी
चित्रपट गुळाचा गणपति
राग / आधार राग भीमपलास
गीत प्रकार भक्तीगीत, चित्रगीत

 

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची

ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे

उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

Scroll to Top