काटा रुते कुणालाआक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावेहा दैवयोग आहे !
सांगू कशी कुणालाकळ आतल्या जिवाची?
चिरदाह वेदनेचामज शाप हाच आहे !
काही करू पहातोरुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेहीविपरीत होत आहे !
हा स्नेह, वंचना की,काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनीमी रिक्तहस्त आहे !