Categories

केव्हातरी पहाटे उलटून

गीत सुरेश भट
संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार ∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर
∙ आशा भोसले 
चित्रपट निवडूंग
राग / आधार राग दुर्गा

 

केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात गेली !

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात गेली !

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !

 

 

 

Scroll to Top