Categories

गोमू संगतीनं माझ्या तू

गीत सुधीर मोघे
संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर आशा भोसले, हेमंतकुमार
चित्रपट हा खेळ सावल्यांचा
गीत प्रकार चित्रगीत, कोळीगीत (दर्यागीत), युगुलगीत

 

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझ्या पिरतीची राणी तू होशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय !

ग तुझं टपोरं डोळं जसं कोळ्याचं जाळं
माझं काळिज घोळं, त्याचं मासोली झालं
माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार नाय

रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जिवाची दैना
मी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाळ्याला अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार.. हाय !
तुझ्या पिरतीची राणी मी होनार हाय !

Scroll to Top