Categories

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

गीतमधुसूदन कालेलकर
संगीतअनिल-अरुण
स्वरपं. वसंतराव देशपांडे, राणी वर्मा
चित्रपटअष्टविनायक
गीत प्रकारचित्रगीत, प्रथम तुला वंदितो

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया

ओंकारा तू, तू अधिनायक
चिंतामणी तू सिद्धिविनायक
मंगलमूर्ती तू भवतारक
सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी
पायी तव मम चिंता

देवा सरू दे माझे मीपण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन
तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठावरती
तुझीच रे गुणगाथा

Scroll to Top