Categories

प्रथम तुला वंदितो

गीत शांताराम नांदगांवकर
संगीत अनिल-अरुण
स्वर अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट अष्टविनायक
राग / आधार राग यमन
गीत प्रकार चित्रगीत, प्रथम तुला वंदितो

 

प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया

विघ्‍नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तिमिरहारका
सुखकारक तू दुःख विदारक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रह्मांडनायका
विनायका प्रभुराया

सिद्धीविनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला
सिंदूरवदना विद्याधिशा
गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा सहाय्य करावे
हा भवसिंधू तराया

गजवदना तव रूप मनोहर
शुक्लांबर शिवसूता
चिंतामणी तू अष्टविनायक
सकलांची देवता
ऋद्धीसिद्धीच्या वरा दयाळा
देई कृपेची छाया

Scroll to Top