ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठी
भेटींत रुष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधीं अधरी
त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी
कितिदां आलो, गेलों, जमलों
रुसण्यावांचूनि परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी
कधीं तिनें मनोरम रुसणें
रुसण्यांत उगीच तें हंसणे
म्हणून तें मनोहर रुसणें
हंसणें-रुसणें-रुसणें-हंसणें
हंसण्यावरती रुसण्यासाठीं, जन्मजन्मीच्या गांठी
कधीं जवळ सुखानें बसलों
दुःखांत सुखाला हंसलों
कधीं गहिंवरलों, कधीं धुसफुसलों
सागरतीरीं आठवणींनीं वाळूंत मारल्या रेघा
जन्मासाठीं जन्म जन्मलों, जन्मांत जमली ना गट्टी