अजय गोगावले, अजय-अतुल, अजयअतुल, गायक, गीतकार, चित्रपट, संगीतकार, सावरखेड एक गाव

आई भवानी तुझ्या कृपेने

गायक गीतकार नाट्यगीत लोकगीत संगीतकार गायक गीतकार नाट्यगीत लोकगीत संगीतकार आई भवानी तुझ्या कृपेने गीत – अजय-अतुल संगीत – अजय-अतुल स्वर – अजय गोगावले चित्रपट – सावरखेड एक गाव गीत प्रकार – चित्रगीत, लोकगीत, भक्तीगीत, या देवी सर्वभूतेषु आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तालाअगाध महिमा तुझी माउली वारी संकटालाआई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारीआज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला येगोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळहातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळधगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माताभक्ती दाटून येते आई नाव तुझे घेताआई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारीआज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला येगोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचाहात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचाअधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिलामहिषासुरमर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज अम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरीअंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला येगोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये अंबाबाईचा.. उधं उधं उधं उधं उधंबोल भवानी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधंसप्तशृंगी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं