गायक

गायक, पं. भीमसेन जोशी, यमन, रचना, राग, राम फाटक, संगीतकार, संत ज्ञानेश्वर

अधिक देखणें तरी

अधिक देखणें तरी गीत – संत ज्ञानेश्वर संगीत – राम फाटक स्वर – पं. भीमसेन जोशी राग / आधार राग – यमन गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल अधिक देखणें तरी निरंजन पाहणें ।योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥ देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥ ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥

अनिलअरुण, अष्टविनायक, गायक, गीतकार, चित्रपट, पं. वसंतराव देशपांडे,राणी वर्मा, मधुसूदन कालेलकर, संगीतकार

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता गीत – मधुसूदन कालेलकर संगीत – अनिल-अरुण स्वर – पं. वसंतराव देशपांडे, राणी वर्मा चित्रपट – अष्टविनायक गीत प्रकार – चित्रगीत, प्रथम तुला वंदितो तू सुखकर्ता तू दुःखहर्तातूच कर्ता आणि करवितामोरया मोरया मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू, तू अधिनायकचिंतामणी तू सिद्धिविनायकमंगलमूर्ती तू भवतारकसर्वसाक्षी तू अष्टविनायकतुझ्या कृपेचा हात मस्तकीपायी तव मम चिंता देवा सरू दे माझे मीपणतुझ्या दर्शने उजळो जीवननित्य करावे तुझेच चिंतनतुझ्या धुळीचे भाळी भूषणसदैव राहो ओठावरतीतुझीच रे गुणगाथा

आम्ही जातो अमुच्या गावा, गायक, गीतकार, चित्रपट, जगदीश खेबूडकर, भूप, राग, संगीतकार, सुधीर फडके, सुधीर फडके

देहाची तिजोरी

देहाची तिजोरी गीत – जगदीश खेबूडकर संगीत – सुधीर फडके स्वर – सुधीर फडके चित्रपट – आम्ही जातो अमुच्या गावा राग / आधार राग – नट, भूप गीत प्रकार – भक्तीगीत, चित्रगीत     देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता, उघड दार देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराचीमनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची?सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य अंधारात पापज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे मापदुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरीआपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरीघडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावीमुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावीमार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा भलेपणासाठी कोणी बुरेपणा केलाबंधनात असुनी वेडा जगी मुक्त झालाआपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा

अरुण दाते, गायक, गीतकार, मनोहर कवीश्वर, यशवंत देव, संगीतकार

अविरत ओठी यावे नाम

अविरत ओठी यावे नाम गीत – मनोहर सांबरे संगीत – यशवंत देव स्वर – अरुण दाते गीत प्रकार – राम निरंजन, भक्तीगीत अविरत ओठी यावे नामश्रीराम जय राम जयजय राम रामनाम हे सदा सुखाचेनिधान जाणा परमेशाचेपतितपावन अवघे नामश्रीराम जय राम जयजय राम जानकीची जणू जीवनज्योतीप्रभु रामाची कोमल मूर्तीमंगल दर्शन पूर्ण विरामश्रीराम जय राम जयजय राम पंचप्राण हे पवनसूताचेराम जणू नि:श्वास तयांचेतनू संजीवन सुंदर धामश्रीराम जय राम जयजय राम

आशा भोसले, गायक, गीतकार, चित्रपट, पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार, सुधीर मोघे, हा खेळ सावल्यांचा, हेमंतकुमार

गोमू संगतीनं माझ्या तू

गोमू संगतीनं माझ्या तू गीत – सुधीर मोघे संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – आशा भोसले, हेमंतकुमार चित्रपट – हा खेळ सावल्यांचा गीत प्रकार – चित्रगीत, कोळीगीत (दर्यागीत), युगुलगीत   गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?माझ्या पिरतीची राणी तू होशील काय?आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय ! ग तुझं टपोरं डोळं जसं कोळ्याचं जाळंमाझं काळिज घोळं, त्याचं मासोली झालंमाझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारारं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरातुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार नाय रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जिवाची दैनामी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणाखुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आलाग तुला रुप्याची नथ मी घालीनग तुला मिरवत मिरवत नेईनतुज्या फसव्या या जाळ्याला अशी मी गावनार नाय गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?आरं संगतीनं तुझ्या मी येणार.. हाय !तुझ्या पिरतीची राणी मी होनार हाय !

अजयअतुल, आरती हवालदार, ऊन पाऊस, गायक, गीतकार, चित्रपट, रचना, राग, वसंत प्रभू, शिवरंजनी, संगीतकार, संत निवृत्तीनाथ

केव्हातरी पहाटे उलटून

केव्हातरी पहाटे उलटून गीत – सुरेश भट संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वराविष्कार – ∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर∙ आशा भोसले  चित्रपट – निवडूंग राग / आधार राग – दुर्गा   केव्हातरी पहाटे उलटून रात गेलीमिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?उसवून श्वास माझा फसवून रात गेली ! कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशीकळले मला न केव्हा निसटून रात गेली उरले उरात काही आवाज चांदण्याचे..आकाश तारकांचे उचलून रात गेली ! स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्तीमग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !      

अनिलअरुण, अष्टविनायक, गीतकार, पं. वसंतराव देशपांडे, यमन, शांताराम नांदगावकर

प्रथम तुला वंदितो

प्रथम तुला वंदितो गीत – शांताराम नांदगांवकर संगीत – अनिल-अरुण स्वर – अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडे चित्रपट – अष्टविनायक राग / आधार राग – यमन गीत प्रकार – चित्रगीत, प्रथम तुला वंदितो   प्रथम तुला वंदितो कृपाळागजानना गणराया विघ्‍नविनाशक, गुणीजन पालकदुरित तिमिरहारकासुखकारक तू दुःख विदारकतूच तुझ्यासारखावक्रतुंड ब्रह्मांडनायकाविनायका प्रभुराया सिद्धीविनायक तूच अनंताशिवात्मजा मंगलासिंदूरवदना विद्याधिशागणाधीपा वत्सलातूच ईश्वरा सहाय्य करावेहा भवसिंधू तराया गजवदना तव रूप मनोहरशुक्लांबर शिवसूताचिंतामणी तू अष्टविनायकसकलांची देवताऋद्धीसिद्धीच्या वरा दयाळादेई कृपेची छाया

अरविंद जगताप, अवधूत गुप्ते, गायक, गीतकार, चित्रपट, ज्ञानेश्वर मेश्राम, झेंडा, संगीतकार

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ गीत – अरविंद जगताप संगीत – अवधूत गुप्‍ते स्वर – ज्ञानेश्वर मेश्राम चित्रपट – झेंडा गीत प्रकार – चित्रगीत जगण्याच्या वारीत मिळे ना वाटसाचले मोहाचे धुके घनदाटआपली माणसं, आपलीच नातीतरी कळपाची मेंढरास भीतीविठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? आजवर ज्यांची वाहिली पालखीभलताच त्यांचा देव होतापुरे झाली आता उगा माथेफोडीदगडात माझा जीव होताउजळावा दिवा म्हणुनीया कितीमुक्या बिचार्‍या जळती वातीवैरी कोण आहे, इथे कोण साथीविठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणंउभ्याउभ्या संपून जाईखळं रितंरितं माझं बघुनी उमगलंकुंपण हिथं शेत खाईभक्ताच्या कपाळी सारखीच मातीतरी, झेंडे वेगळे वेगळ्या जातीसत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीतीविठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?

कुसुमाग्रज, गायक, गीतकार, लता मंगेशकर, वसंत प्रभू, संगीतकार

अनाम वीरा जिथें जाहला

अनाम वीरा जिथें जाहला गीत – कुसुमाग्रज संगीत – वसंत प्रभु स्वर – लता मंगेशकर राग / आधार राग – यमन गीत प्रकार – स्फूर्ती गीत अनाम वीरा जिथें जाहला तुझा जीवनान्‍तस्तंभ तिथें ना कुणी बांधला, पेटली ना वात ! धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशींजळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी ! मूकपणानें तमीं लोपती संध्येच्या रेषामरणामध्यें विलीन होसी, ना भय ना आशा ! जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भावरियासतीवर नसे नोंदलें कुणी तुझें नांव ! जरी न गातिल भाट डफावर तुझें यशोगान !सफल जाहलें तुझेंच हें रे तुझेंच बलिदान ! काळोखांतुनि विजयाचा ये पहाटचा ताराप्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

अजय गोगावले, अजय-अतुल, अजयअतुल, गायक, गीतकार, चित्रपट, संगीतकार, सावरखेड एक गाव

आई भवानी तुझ्या कृपेने

गायक गीतकार नाट्यगीत लोकगीत संगीतकार गायक गीतकार नाट्यगीत लोकगीत संगीतकार आई भवानी तुझ्या कृपेने गीत – अजय-अतुल संगीत – अजय-अतुल स्वर – अजय गोगावले चित्रपट – सावरखेड एक गाव गीत प्रकार – चित्रगीत, लोकगीत, भक्तीगीत, या देवी सर्वभूतेषु आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तालाअगाध महिमा तुझी माउली वारी संकटालाआई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारीआज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला येगोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळहातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळधगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माताभक्ती दाटून येते आई नाव तुझे घेताआई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारीआज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला येगोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचाहात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचाअधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिलामहिषासुरमर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज अम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरीअंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला येगोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये अंबाबाईचा.. उधं उधं उधं उधं उधंबोल भवानी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधंसप्तशृंगी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं

Scroll to Top