अनाम वीरा जिथें जाहला
अनाम वीरा जिथें जाहला गीत – कुसुमाग्रज संगीत – वसंत प्रभु स्वर – लता मंगेशकर राग / आधार राग – यमन गीत प्रकार – स्फूर्ती गीत अनाम वीरा जिथें जाहला तुझा जीवनान्तस्तंभ तिथें ना कुणी बांधला, पेटली ना वात ! धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशींजळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी ! मूकपणानें तमीं लोपती संध्येच्या रेषामरणामध्यें विलीन होसी, ना भय ना आशा ! जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भावरियासतीवर नसे नोंदलें कुणी तुझें नांव ! जरी न गातिल भाट डफावर तुझें यशोगान !सफल जाहलें तुझेंच हें रे तुझेंच बलिदान ! काळोखांतुनि विजयाचा ये पहाटचा ताराप्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !