राग
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती
गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार स्वयें श्रीरामप्रभु ऐकती स्वयें श्रीरामप्रभु ऐकतीकुश लव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचेसजीव पुतळे रघुरायाचेपुत्र सांगती चरित पित्याचेज्योतिनें तेजाची आरती राजस मुद्रा, वेष मुनींचेगंधर्वच ते तपोवनींचेवाल्मीकींच्या भाव मनींचेमानवी रुपें आकारती ते प्रतिभेच्या आम्रवनांतिलवसंत-वैभव गाते कोकिलबालस्वराने करुनी किलबिलगायनें ऋतुराजा भारिती फुलांपरी ते ओठ उमलतीसुगंधसे स्वर भुवनीं झुलतीकर्णभूषणें कुंडल डुलतीसंगती वीणा झंकारिती सात स्वरांच्या स्वर्गामधुनीनऊ रसांच्या नऊ स्वर्धुनीयज्ञ-मंडपीं आल्या उतरुनीसंगमीं श्रोतेजन नाहती पुरुषार्थाची चारी चौकटत्यात पाहतां निजजीवनपटप्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कटप्रभुचे लोचन पाणावती सामवेदसे बाळ बोलतीसर्गामागुन सर्ग चालतीसचिव, मुनिजन, स्त्रिया डोलतीआंसवें गाली ओघळती सोडुनि आसन उठले राघवउठुन कवळिती अपुले शैशवपुत्रभेटिचा घडे महोत्सवपरि तो उभयां नच माहिती
शब्दावाचुन कळले सारे
गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार शब्दावाचुन कळले सारे शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडलेप्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळालाछंद नवा अन् ताल निराळात्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले? आठवते पुनवेच्या रात्रीलक्ष दीप विरघळले गात्रीमिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले
काटा रुते कुणाला
काटा रुते कुणाला गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार काटा रुते कुणालाआक्रंदतात कोणीमज फूलही रुतावेहा दैवयोग आहे ! सांगू कशी कुणालाकळ आतल्या जिवाची?चिरदाह वेदनेचामज शाप हाच आहे ! काही करू पहातोरुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणेहीविपरीत होत आहे ! हा स्नेह, वंचना की,काहीच आकळेनाआयुष्य ओघळोनीमी रिक्तहस्त आहे !
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुले नामिटले तसेच ओठ की पाकळी हले ना ! समजूत मीं करावी म्हणुनीच तूं रुसावेंमीं हास सांगतांच रडतांहि तूं हसावेंतें आज कां नसावें, समजावणी पटेनाधरिला असा अबोला की बोल बोलवे ना ! की गूढ कांहि डाव, वरचा न हा तरंगघेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग?रुसवा असा कसा हा ज्या आपलें कळेना?अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुलेना !
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठीभेटींत रुष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कधीं अधरीत्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरीकितिदां आलो, गेलों, जमलोंरुसण्यावांचूनि परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी कधीं तिनें मनोरम रुसणेंरुसण्यांत उगीच तें हंसणेम्हणून तें मनोहर रुसणेंहंसणें-रुसणें-रुसणें-हंसणेंहंसण्यावरती रुसण्यासाठीं, जन्मजन्मीच्या गांठी कधीं जवळ सुखानें बसलोंदुःखांत सुखाला हंसलोंकधीं गहिंवरलों, कधीं धुसफुसलोंसागरतीरीं आठवणींनीं वाळूंत मारल्या रेघाजन्मासाठीं जन्म जन्मलों, जन्मांत जमली ना गट्टी
शुक्रतारा मंद वारा
गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार शुक्रतारा मंद वारा शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनीचंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनीआज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहातू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुलाअंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहातू असा जवळी रहा लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवाअंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवाभारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हातू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणीदाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनीवाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हातू असा जवळी रहा
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी गीत – ग. दि. माडगूळकर संगीत – पु. ल. देशपांडे स्वर – पं. भीमसेन जोशी चित्रपट – गुळाचा गणपति राग / आधार राग – भीमपलास गीत प्रकार – भक्तीगीत, चित्रगीत इंद्रायणी काठी, देवाची आळंदीलागली समाधी, ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिवनाचती वैष्णव, मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेडअंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊननिवृत्ती, सोपान, मुक्ताबाई
अधिक देखणें तरी
अधिक देखणें तरी गीत – संत ज्ञानेश्वर संगीत – राम फाटक स्वर – पं. भीमसेन जोशी राग / आधार राग – यमन गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल अधिक देखणें तरी निरंजन पाहणें ।योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥ देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥ ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥
देहाची तिजोरी
देहाची तिजोरी गीत – जगदीश खेबूडकर संगीत – सुधीर फडके स्वर – सुधीर फडके चित्रपट – आम्ही जातो अमुच्या गावा राग / आधार राग – नट, भूप गीत प्रकार – भक्तीगीत, चित्रगीत देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता, उघड दार देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराचीमनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची?सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य अंधारात पापज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे मापदुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरीआपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरीघडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावीमुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावीमार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा भलेपणासाठी कोणी बुरेपणा केलाबंधनात असुनी वेडा जगी मुक्त झालाआपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा