यमन

गायक, पं. भीमसेन जोशी, यमन, रचना, राग, राम फाटक, संगीतकार, संत ज्ञानेश्वर

अधिक देखणें तरी

अधिक देखणें तरी गीत – संत ज्ञानेश्वर संगीत – राम फाटक स्वर – पं. भीमसेन जोशी राग / आधार राग – यमन गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल अधिक देखणें तरी निरंजन पाहणें ।योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥ देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥ ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥

अनिलअरुण, अष्टविनायक, गीतकार, पं. वसंतराव देशपांडे, यमन, शांताराम नांदगावकर

प्रथम तुला वंदितो

प्रथम तुला वंदितो गीत – शांताराम नांदगांवकर संगीत – अनिल-अरुण स्वर – अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडे चित्रपट – अष्टविनायक राग / आधार राग – यमन गीत प्रकार – चित्रगीत, प्रथम तुला वंदितो   प्रथम तुला वंदितो कृपाळागजानना गणराया विघ्‍नविनाशक, गुणीजन पालकदुरित तिमिरहारकासुखकारक तू दुःख विदारकतूच तुझ्यासारखावक्रतुंड ब्रह्मांडनायकाविनायका प्रभुराया सिद्धीविनायक तूच अनंताशिवात्मजा मंगलासिंदूरवदना विद्याधिशागणाधीपा वत्सलातूच ईश्वरा सहाय्य करावेहा भवसिंधू तराया गजवदना तव रूप मनोहरशुक्लांबर शिवसूताचिंतामणी तू अष्टविनायकसकलांची देवताऋद्धीसिद्धीच्या वरा दयाळादेई कृपेची छाया

Scroll to Top