रचना
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुले नामिटले तसेच ओठ की पाकळी हले ना ! समजूत मीं करावी म्हणुनीच तूं रुसावेंमीं हास सांगतांच रडतांहि तूं हसावेंतें आज कां नसावें, समजावणी पटेनाधरिला असा अबोला की बोल बोलवे ना ! की गूढ कांहि डाव, वरचा न हा तरंगघेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग?रुसवा असा कसा हा ज्या आपलें कळेना?अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुलेना !
निघालो घेऊन दत्ताची
चित्रपट संगीतकार गायक बाबुराव गोखले माधव भागवत आशालता वाबगावकर संजय उपाध्ये आरती हवालदार आशा भोसले निलाक्षी जुवेकर शंकर महादेवन श्रीधर फडके राग रचना गीतकार अजयअतुल कुसुमाग्रज ग दि माडगूळकर ग्रेस छोटा गंधर्व जगदीश खेबूडकर यशवंत देव राम कदम वि स खांडेकर शान्ता शेळके चित्रपट संगीतकार गायक बाबुराव गोखले माधव भागवत आशालता वाबगावकर संजय उपाध्ये आरती हवालदार आशा भोसले निलाक्षी जुवेकर शंकर महादेवन श्रीधर फडके राग रचना गीतकार अजयअतुल कुसुमाग्रज ग दि माडगूळकर ग्रेस छोटा गंधर्व जगदीश खेबूडकर यशवंत देव राम कदम वि स खांडेकर शान्ता शेळके निघालो घेऊन दत्ताची दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखीआम्ही भाग्यवान आनंद निधानझुलते हळूच दत्ताची पालखी रत्नांची आरास साज मखमलीत्यावर सुगंधी फुले गोड ओलीझुळुक कोवळी चंदनासारखी सात जन्मांची ही लाभली पुण्याईम्हणून जाहलो पालखीचे भोईशांत मायामूर्ति पहाटेसारखी वाट वळणाची जिवाला या ओढीदिसते समोर नरसोबाची वाडीडोळियांत गंगा जाहली बोलकी
अधिक देखणें तरी
अधिक देखणें तरी गीत – संत ज्ञानेश्वर संगीत – राम फाटक स्वर – पं. भीमसेन जोशी राग / आधार राग – यमन गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल अधिक देखणें तरी निरंजन पाहणें ।योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥ देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥ ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥
केव्हातरी पहाटे उलटून
केव्हातरी पहाटे उलटून गीत – सुरेश भट संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वराविष्कार – ∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर∙ आशा भोसले चित्रपट – निवडूंग राग / आधार राग – दुर्गा केव्हातरी पहाटे उलटून रात गेलीमिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?उसवून श्वास माझा फसवून रात गेली ! कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशीकळले मला न केव्हा निसटून रात गेली उरले उरात काही आवाज चांदण्याचे..आकाश तारकांचे उचलून रात गेली ! स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्तीमग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !