अधिक देखणें तरी
अधिक देखणें तरी गीत – संत ज्ञानेश्वर संगीत – राम फाटक स्वर – पं. भीमसेन जोशी राग / आधार राग – यमन गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल अधिक देखणें तरी निरंजन पाहणें ।योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥ देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥ ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥