आशा भोसले, गायक, गीतकार, चित्रपट, पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार, सुधीर मोघे, हा खेळ सावल्यांचा, हेमंतकुमार

गोमू संगतीनं माझ्या तू

गोमू संगतीनं माझ्या तू गीत – सुधीर मोघे संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – आशा भोसले, हेमंतकुमार चित्रपट – हा खेळ सावल्यांचा गीत प्रकार – चित्रगीत, कोळीगीत (दर्यागीत), युगुलगीत   गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?माझ्या पिरतीची राणी तू होशील काय?आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय ! ग तुझं टपोरं डोळं जसं कोळ्याचं जाळंमाझं काळिज घोळं, त्याचं मासोली झालंमाझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारारं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरातुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार नाय रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जिवाची दैनामी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणाखुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आलाग तुला रुप्याची नथ मी घालीनग तुला मिरवत मिरवत नेईनतुज्या फसव्या या जाळ्याला अशी मी गावनार नाय गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?आरं संगतीनं तुझ्या मी येणार.. हाय !तुझ्या पिरतीची राणी मी होनार हाय !