वसंत प्रभू

अजयअतुल, आरती हवालदार, ऊन पाऊस, गायक, गीतकार, चित्रपट, रचना, राग, वसंत प्रभू, शिवरंजनी, संगीतकार, संत निवृत्तीनाथ

केव्हातरी पहाटे उलटून

केव्हातरी पहाटे उलटून गीत – सुरेश भट संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वराविष्कार – ∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर∙ आशा भोसले  चित्रपट – निवडूंग राग / आधार राग – दुर्गा   केव्हातरी पहाटे उलटून रात गेलीमिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?उसवून श्वास माझा फसवून रात गेली ! कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशीकळले मला न केव्हा निसटून रात गेली उरले उरात काही आवाज चांदण्याचे..आकाश तारकांचे उचलून रात गेली ! स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्तीमग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !      

कुसुमाग्रज, गायक, गीतकार, लता मंगेशकर, वसंत प्रभू, संगीतकार

अनाम वीरा जिथें जाहला

अनाम वीरा जिथें जाहला गीत – कुसुमाग्रज संगीत – वसंत प्रभु स्वर – लता मंगेशकर राग / आधार राग – यमन गीत प्रकार – स्फूर्ती गीत अनाम वीरा जिथें जाहला तुझा जीवनान्‍तस्तंभ तिथें ना कुणी बांधला, पेटली ना वात ! धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशींजळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी ! मूकपणानें तमीं लोपती संध्येच्या रेषामरणामध्यें विलीन होसी, ना भय ना आशा ! जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भावरियासतीवर नसे नोंदलें कुणी तुझें नांव ! जरी न गातिल भाट डफावर तुझें यशोगान !सफल जाहलें तुझेंच हें रे तुझेंच बलिदान ! काळोखांतुनि विजयाचा ये पहाटचा ताराप्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

Scroll to Top